श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरु तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या नावाने गौरविले.
श्री गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा. यासाठी श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त ग्रामपंचायत कुवारबांव येथे विशेष सभेचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत धर्मस्वातंत्र, मानवता आणि ऐक्याचा संदेश दिला. ग्रामपंचायत कुवारबांव कार्यालयात दररोज श्री. सतींदर सरताजजी यांचे भक्तीगीत लाऊडस्पीकरवर ऐकविण्यात आले. हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. ग्राम स्तरावर दिव्यांग शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, कुवारबांव उत्कर्षनगर मराठी शाळा येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. शिक्षण विभागाच्या उपक्रमांची अंमलबजावणी करताना वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, समूहगीत गायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.









